Оберіть трек для відтворення
Сингл / Трек
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां
जय देव जय देव जय श्रीशंकरा
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें
तें त्वां असुरपणें प्राशन केलें
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं जय देव जय देव