Оберіть трек для відтворення

प्रभातकाळी प्रभा निराळी
प्रभातकाळी प्रभा निराळी
सुवर्ण-तांबूस, निळी-सावळी
मुखी गजानन नाम घेऊनी
उठली भूपाळी, हो, उठली भूपाळी
प्रभातकाळी प्रभा निराळी
सुवर्ण तांबूस निळी-सावळी
मुखी गजानन नाम घेऊनी
उठली भूपाळी, हो, उठली भूपाळी
बिंब गजानन, पक्षी गजानन
पाण्यावरची नक्षी गजानन
बिंब गजानन, पक्षी गजानन
पाण्यावरची नक्षी गजानन
प्रसन्नतेचा साज लेवूनी
उठली भूपाळी, हो, उठली भूपाळी
मृदुंग गजानन, टाळ गजानन
चंदन लिंपून भाळ गजानन
मृदुंग गजानन, टाळ गजानन
चंदन लिंपून भाळ गजानन
निरांजनाच्या गाती फुलवीत
उठली भूपाळी, हो, उठली भूपाळी
सूर गजानन, नाद गजानन
भक्तांचा संवाद गजानन
सूर गजानन, नाद गजानन
भक्तांचा संवाद गजानन
भक्ती रसाने भिजून गजानन
उठली भूपाळी, हो, उठली भूपाळी
दीर्घ गजानन, ऱ्हस्व गजानन
चराचरी सर्वस्व गजानन
दीर्घ गजानन, ऱ्हस्व गजानन
चराचरी सर्वस्व गजानन
गजाननाचा श्वास घेऊनी
उठली भूपाळी, हो, उठली भूपाळी
प्रभातकाळी प्रभा निराळी
सुवर्ण-तांबूस, निळी-सावळी
मुखी गजानन नाम घेऊनी
उठली भूपाळी, हो, उठली भूपाळी
उठली भूपाळी, हो, उठली भूपाळी