Оберіть трек для відтворення
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेती-नेती शब्द नये अनुमाना
सुरवर, मुनिजन, योगी समाधी नये ध्याना
जय देव, जय देव...
जय देव, जय देव, जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता
जय देव, जय देव...
सबाह्य अभ्यंकरी तू एक दत्त
अभाग्यासी कैची न कळे ही मात
पराही परतली तेथे कैचा हेत
जन्म-मरणाचा पुरलासे अंत
जय देव, जय देव...
जय देव, जय देव, जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता
जय देव, जय देव...
दत्त येऊनियां ऊभा ठाकला
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला
जन्म-मरणाचा फेरा चुकवीला
जय देव, जय देव...
जय देव, जय देव, जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता
जय देव, जय देव...
दत्त-दत्त ऐसे लागले ध्यान
हारपले मन, झाले उन्मन
मी-तू पणाची झाली बोलवण
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान
जय देव, जय देव...
जय देव, जय देव, जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता
जय देव, जय देव...