Оберіть трек для відтворення
सावला पांडुरंग
सावला पांडुरंग
पहिली माझी ओवी गायी एक एका
ब्रम्हा विष्णू देखा हारो हारी
दुसरी माझी ओवी गायीली विठ्ठला
भेटू दे सावला पांडुरंग
सावला पांडुरंग
तिसरी माझी ओवी अठ्ठावीस युग
उभा विटे वरी पांडुरंग
चवथी माझी ओवी संपत्ती सागरा
विठ्ठला उदाराभेट देशी
सावला पांडुरंग
पाचवी माझी ओवी
पंचपर्ण ज्योती
ओवाळीला पती रुक्मिणीचा
सहावी माझी ओवी
नवगुणी गायीली
पूजा आरंभिली विठ्ठलाची
सावला पांडुरंग
सावला पांडुरंग
सावला पांडुरंग