Оберіть трек для відтворення
Сингл / Трек
झुंजु मुंजु पहाट झाली कोंबड्यानं बांग दिली
सूर्याला लाली आली धरतीला जाग आली
भिरिभिरिती रानीवनी पाखरं
भिरिभिरिती रानीवनी पाखरं हे
मैतर माझ्यारे ढवळ्या न् पवळ्या शेताला घेऊन चालरं

धुकं पडलंया दाट अंधारली ही वाट
घाटमाथ्यातुन वाहे पाट
घाटमाथ्यातुन वाहे पाट
सूर धार ही मोट किरकिरं रं हाट
पाणी ओढ्याचं ओढीते लाट
पाणी ओढ्याचं ओढीते लाट
नागमोडीनं चालली ही वाट रं
रानफुलांचा घमघमतो वास रं
मैतर माझ्यारे ढवळ्या न् पवळ्या शेताला घेऊन चालरं
मैतर माझ्यारे ढवळ्या न् पवळ्या शेताला घेऊन चालरं
शेताचा बांधावर बांधाच्या झाडावर झाडाच्या फांदीवर
फांदीच्या पानावर पानाच्या घरट्यात लपून बसलंय कोण रं
त्याला गोफण गुंड्यानं हाण रं
मैतर माझ्यारे ढवळ्या न् पवळ्या शेताला घेऊन चालरं
मैतर माझ्यारे ढवळ्या न् पवळ्या शेताला घेऊन चालरं
दूर गेली नजर डोईवरती पदर
घरची लक्षुमी शेताला आली
घरची लक्षुमी शेताला आली
अन तिनं दिली भाकर दिला खाऊन ढेकर
गोडी न्यारीच चटणीला आली
गोडी न्यारीच चटणीला आली
तुझ्या कष्टाची दौलत राख रे
नको विसावा थोडी हि झोप रं