Оберіть трек для відтворення
सख्या, मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे
सख्या, मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे
नभात शुक्र चांदणे...
नभात शुक्र चांदणे अजूनही दिसायचे
सख्या, मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे
कशास लाज लाजसी घडी-घडीस, साजणा?
कशास लाज लाजसी घडी-घडीस, साजणा?
मनात काय माझिया...
मनात काय माझिया, प्रिया, तुला कळेच ना
मिठीतले शहार मी...
मिठीतले शहार मी धुक्यात का जपायचे?
सख्या, मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे
अजून सावळ्या, तुझ्या कळीत गुंतलास ना
अजून सावळ्या, तुझ्या कळीत गुंतलास ना
बटेत सोनकेवडा अजून माळलास ना
बटेत सोनकेवडा अजून माळलास ना
करू नकोस देर तू...
करू नकोस देर तू, उगाच मी रुसायचे
सख्या, मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे
तुझ्याच आज अंगणी हरी प्रिया खुणावते
तुझ्याच आज अंगणी हरी प्रिया खुणावते
तुझीच चंद्रकोर मी...
तुझीच चंद्रकोर मी लपून रोज लावते
जपू नको रे श्वास हे...
जपू नको रे श्वास हे जगास त्या कळायचे
सख्या, मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे
नभात शुक्र चांदणे...
नभात शुक्र चांदणे अजूनही दिसायचे
सख्या, मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे