Оберіть трек для відтворення
पहिला पाऊस पहिली आठवण
पहिल्या घरट पहिलं आंगण
पहिली माती पहिला गंध
पहिल्या मनात पहिलाच बांध
पहिलं आभाळ पहिलं रान
पहिल्या झोळीत पहिलंच पान
पहिलं तळहात पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेम्ब
पहिलाच पाऊस पहिलीच आठवण
पहिल्या घरट्याचं पहिलंच आंगण
रिमझिम धून आभाळ भरुन
हरवले मन येणार हे कोण
रिमझिम धून आभाळ भरुन
हरवले मन येणार हे कोण
मन फुलांचा थवा गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा जुन्यात हरवून
मन फुलांचा थवा गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा जुन्यात हरवून
रिमझिम धून आभाळ भरुन
हरवले मन येणार हे कोण
गूज मनीचे मनाला आठवूनी त्या क्षणाला
गूज मनीचे मनाला आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला सांगावे का माझे मला
उगाच मनात बावरुन रिमझिम धून आभाळ भरुन
हरवले मन येणार हे कोण
वार्यात गाणे कुणाचे गाण्यात वारे मनाचे
वार्यात गाणे कुणाचे गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्यात आता मनाच्या वार्यात आता
सुरात तुला मी कवळून रिमझिम धून आभाळ भरुन
हरवले मन येणार हे कोण
रिमझिम धून आभाळ भरुन
हरवले मन येणार हे कोण
येणार हे कोण येणार हे कोण
येणार हे कोण येणार हे कोण