Оберіть трек для відтворення
मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना
उघडी परि राहील ती विश्व सोडताना
मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना
गूढ बालपणीचे सारे अव्यक्त ठेविले
गुज कोवळ्या मूठीचे झाकून घेतले
कुणी तुझ्या जीवनाला जीवनाला
घातला उखाणा
मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना
चाखिशी फळे कर्माची जशी कडूगोड रे
भविष्यात काय असावे हीच जीवा ओढ रे
स्वप्नीच्या धनाचा सारा धनाचा सारा
छंद हा पुराना
मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना
आली अखेरी आता जीविताची यात्रा
जीविताची यात्रा
अंती मानवाला मात्र मिळे एक मात्रा
मिळे एक मात्रा
नुरे सांगण्यास काही सांगण्यास काही
जीवीच्या जीवना
मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना
उघडी परि राहील ती विश्व सोडताना