Оберіть трек для відтворення
आ आ आ
रंग तुझा सावळा
दे मला गोविंदा घननिळा
रंग तुझा सावळा रंग तुझा सावळा
तुझ्या रूपाचे नयनी काजळ
तुझ्या रूपाचे नयनी काजळ
सूर मुरलीचे कानी कुंडल
सूर मुरलीचे कानी कुंडल
मुग्ध मनाची करुनी ओंजळ करिते अर्पण तुला
रंग तुझा सावळा
तरूतळी या कुंजवनातुन आ आ
तरूतळी या कुंजवनातुन
तू गोरा मी काळी होउन
गोपि कृष्ण हा गोफ गुंफुन
गोपि कृष्ण हा गोफ गुंफुन करु दे नर्तन मला
रंग तुझा सावळा
तुझिया चरणी क्षणि एकान्ती
तुझिया चरणी क्षणि एकान्ती
धुंद जळी या यमुनाकाठी
धुंद जळी या यमुनाकाठी
माझी भक्ती होउन मुक्ती करु दे मधुकर ताला
रंग तुझा सावळा
दे मला गोविंदा घननिळा
रंग तुझा सावळा रंग तुझा सावळा