Оберіть трек для відтворення
रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात
प्रियाविण उदास वाटे रात
रिमझिम झरती श्रावणधारा
बरस बरस तू मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे आतुरलेले लोचन माझे
बघती अंधारात
प्रियाविण उदास वाटे रात
रिमझिम झरती श्रावणधारा
प्रासादी या जिवलग येता आ आ
प्रासादी या जिवलग येता
कमलमिठीमध्ये भृंग भेटता
बरस असा की प्रिया न जाईल
बरस असा की प्रिया न जाईल माघारी दारात
प्रियाविण उदास वाटे रात
रिमझिम झरती श्रावणधारा
मेघा असशी तू आकाशी वर्षातून तू कधी वर्षसी
वर्षामागून वर्षती नात्याने
वर्षामागून वर्षती नात्याने
करती नीट बरसात
प्रियाविण उदास वाटे रात
रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात