Оберіть трек для відтворення
तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपति
सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा
शुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा
छेडिनि वीणा छेडिनि वीणा
जागवते तुज सरस्वती भगवती
अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपति
ऊठ महागणपति
आवडती तुज म्हणुन आणिली
आवडती तुज म्हणुन आणिली रक्तवर्ण कमळे
पाचुमण्यांच्या किरणासम हि हिरवी दुर्वादळे
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती
अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपति
ऊठ महागणपति
शूर्पकर्णका ऊठ गजमुखा उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगांचा तूंच नियंता विश्वासी आसरा
तूझ्या दर्शना अधीर देवा हर ब्रम्हा श्रीपती
अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपति