Оберіть трек для відтворення
भेट तुझी माझी स्मरते
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते
कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा
कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नांव गांव टाकुन आली अशी तुझी प्रीती
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नांव गांव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला मुळी जाणिव नव्हती
तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते
केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली
केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा
श्वासांनी हं हं
श्वासांनी लिहीली गाथा प्रीतिच्या रसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते
सुगंधीच हळव्या शपथा सुगंधीच श्वास
सुगंधीच हळव्या शपथा सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते