तुझ्याचसाठी भरून आलो
तुझ्या नभात तरंगून जाई
तुझाच श्रावण होईन ओला
तुझ्या मनावर बरसून जाई
काळजावर चांद ठेवावा
इतके काळीज दुखते आहे
यातून मग जे सुचेल गाणे
तेच तुला मी देऊन जाई
तुला पाहिजे तशा सुरांची
नसेल माझी धून तरी पण
तुझ्याचसाठी सूर शोधले
तुझ्याचसाठी गाऊन जाई