Оберіть трек для відтворення
गीत गायनाच्या क्षेत्रातील विख्यात गायिका
सुमन कल्याणपूर हे नाव कोणाला ठाऊक नाही
माझी आणि त्यांची ओळख त्या सुमन हेमाडे असल्यापासूनची
सन १९५०-५१ चा सुमार असेल
त्याही काळी त्यांनी आपल्या गायन शैलीने
रसिकांच्या मनात खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या
यथावकाश पुष्कळ मेहनत घेऊन त्यांनी आपला ठसा
मराठी आणि हिंदी गाण्यावर उमटवला
त्यांची अनेक गाणी लोकप्रिय ही आहेत
त्यांच्या आवाजात माझं जे गाण प्रथम ध्वनिमुद्रित झालं
तो एक अभंग होता
संत नामदेव महाराजांचा
आकाशवाणीवरच्या "मंगलप्रभात"
या सकाळच्या भाक्तीगीतांच्या कार्यक्रमात
आपण तो ऐकीलाही असणार
बघा आठवतंय का
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पिलू वाट पाहे
पिलू वाट पाहे उपवासी
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
तैसे माझे मन धरी वो तुझी आस
तैसे माझे मन धरी वो तुझी आस
चरण रात्रंदिवस चिंतीतसे
चरण रात्रंदिवस चिंतीतसे
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
तान्हे वत्स घरी बांधिलेसे देवा
तान्हे वत्स घरी बांधिलेसे देवा
तान्हे वत्स घरी बांधिलेसे देवा
त्या हृदयी धावा
त्या हृदयी धावा माऊलीचा
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
नामा म्हणे देवा तू माझा सोयरा
नामा म्हणे देवा तू माझा सोयरा
झणी मज अव्हेरा अनाथनाथा
झणी मज अव्हेरा अनाथनाथा
अनाथनाथा, अनाथनाथा
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये