Оберіть трек для відтворення
काय विधीची दैवगती दैवगती
वनी एकटी दमयंती
वनी एकटी दमयंती
कोमल शय्या मृदुल तृणांची
श्रमवी काया दमयंतीची
व्याकुळ नयने शोधित राही
व्याकुळ नयने शोधित राही
प्राणविसावा निषधपती
वनी एकटी दमयंती
वनी एकटी दमयंती
कोठे असशी प्राणवल्लभा
दीप तू सख्या मी तुझी प्रभा
हाक ऐकुनी येशिल का रे
विनवी अजुनी किती
विनवी अजुनी किती
वनी एकटी दमयंती
वनी एकटी दमयंती
किंचित खुलली नयनपाकळी
पण नव्हता नलराजा जवळी
अश्रू विरही झरती गाली
अश्रू विरही झरती गाली
शिणवी अपुले नयन किती
वनी एकटी दमयंती
वनी एकटी दमयंती
काय विधीची दैवगती दैवगती
वनी एकटी दमयंती
वनी एकटी दमयंती