Оберіть трек для відтворення

छळतसे काजळ काळी रात
छळतसे काजळ काळी रात
नभी चंद्रमा धवल पौर्णिमा तरीही मी तिमीरात
छळतसे काजळ काळी रात
छळतसे काजळ काळी रात
सूर जुळविले जिथे अंगणी
सूर जुळविले जिथे अंगणी
मधूर छेडिली एक रागिणी
अबोल झाली सतार का रे आज तुझ्या विरहात
छळतसे काजळ काळी रात
प्राणांची तूघालुनी फुंकर
प्रीतीचा फुलविलास अंकुर
प्रीतीचा फुलविलास अंकुर
अमृतात ही न्हाली लतिका कोमेजली निमिषात
छळतसे काजळ काळी रात
नको चांदणे नको गंध हा
आर्त स्वरांचा नको छंद हा
नको चांदणे नको गंध हा
आर्त स्वरांचा नको छंद हा
एक स्मृती तव त्या स्पर्शांची अमर असो हृदयात
माजू दे काजळ काळी रात
माजू दे काजळ काळी रात
माजू दे काजळ काळी रात